लहानपणी ससा आणि कासव यांच्या शर्यतीची गोष्ट न ऐकलेला माणूस मिळणं म्हणजे हवा नसलेला वेफरचा पाउच मिळण्याएवढं कठीण आहे. या गोष्टीचा संदर्भ एवढ्यासाठी कि मागच्याच आठवड्यात म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी मी अशीच एक आगळी वेगळी शर्यत पाहिली. कासवांची शर्यत… शर्यत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची… ज्यात त्यांना सोबत असते ती जगण्याच्या निरागस ओढीची… आपण “बेसिक इनस्टीक्ट” वैगेरे असं काहीतरी म्हणतो नां…. त्याचीच शर्यत!
आणि या शर्यतीत हरत कोणीच नाही… सगळेच जिंकतात, किंबहुना जे जिंकतात तेच या शर्यतीचा अविभाज्य भाग बनून जातात!
Finding a person who hasn’t heard of rabbit and turtle racing as a child is as difficult as getting a pouch of airless wafers. The reference to this is that last week, on the second day of Holi, I saw a very different race. The race of turtles … the race of survival of the fittest … in which the innocent urge to live is accompanied by them … we say something like “Basic Instinct” and so on … that’s the race!
And there is no one who loses in this race … everyone wins, in fact, those who win become an integral part of this race!
मला प्रवास करण्याची आणि फोटोग्राफीची आवड, सतत काहीतरी नवीन पाहणे, नवीन ठिकाणे पालथी घालणे, यामुळे माझा जीव नेहमीच माझ्या पायात अडकलेला असतो. असाच प्रवास करता करता एकदा मित्रांबरोबर आपल्याच महाराष्ट्रातल्या वेळास या गावी जाण्याची संधी मिळाली.
रत्नागिरी जिल्ह्यामधील एक छोटंसं टुमदार गाव, अथांग, निळ्याशार समुद्रकिनारी वसलेलं, निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं आणि तिथल्या भोळ्या पण प्रेमळ माणसांमध्ये वसलेलं “वेळास”. मुंबईहून पाच- साडे पाच तासात वेळासला गाडीने पोहोचत येते. एस. टी. बसेसहि गावात येतात, त्यामुळे एका दिवसातही आपण या गावी भेट देऊन मुंबईला परतू शकतो.
तशी माझी या गावाला भेट देण्याची ही गेल्या तीन वर्षामधली चौथी वेळ, पण प्रत्येकवेळी या गावात मला नेहमीच काही नां काही नवीन मिळत असतं…
I love travelling and photography, constantly seeing something new, exploring new places, so my life is always stuck at my feet. While travelling like this, I got an opportunity to visit this village with my friends from Maharashtra.
A small beautiful village in Ratnagiri district, situated on the endless, blue beach, endowed with the bounty of nature and settled among the naive but loving people of “Velas”. Velas can be reached in five-and-a-half hours by car from Mumbai. S. T. Buses come to the village, so we can visit this village in one day and return to Mumbai.
My visit to the village is the fourth of the last three, but every time I have to say something New Year …
हे गाव तसं शांत पण, फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांमध्ये असंख्य पर्यटकांचे पाय या गावाकडे आपसूक वळतात, कारण येथे होणारा “समुद्र कासव महोत्सव”.
आजच्या घडीला, जगात समुद्री कासवांच्या केवळ सहा ते सातच प्रजाती शिल्लक आहेत आणि त्याही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील अत्यंत दुर्मिळ प्रजातीची “ऑलिव रिडले” नावाच्या कासवांची मादी येथे प्रजननासाठी येतात. नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात या कासवांच्या असंख्य माद्या त्यांची अंडी या समुद्र किनाऱ्यावर वाळूच्या घरट्यात देतात आणि पुन्हा आपल्या प्रवासाला निघून जातात त्या कायमच्याच, पुन्हा कधीही न परतण्यासाठी.
दोन ते तीन महिन्यानंतर हळूहळू पिल्ले या घरट्यातून बाहेर येतात आणि आपल्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात करतात. या कासवांच्या बाबतीत असं म्हटलं जातं कि जेव्हा १००० पिल्ले या अंड्यांमधून बाहेर येतात त्यातील केवळ एकच भाग्यवान कासव आपलं संपूर्ण आयुष्य जगते. या कारणामुळे या कासवांचे प्रजनन, संवर्धन आणि संरक्षण याला खूप महत्व आहे. या प्रकियेचा मधला काळ खूप नाजूक आणि महत्वाचा असतो, कारण कासवाची मादी कधीच तिच्या अंड्याबरोबर राहत नाही, त्यामुळे त्या अंड्यांना आणि पर्यायाने कासवांना अनेक प्राणी, पक्षी, साप आणि कधी-कधी माणूसदेखील आपले लक्ष्य करतात, तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे यांचे अतोनात नुकसान होते.
या कासवांच्या अंड्याचे रक्षण करण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी आणि पिल्ले अंड्यातून बाहेर आल्यावर त्यांना त्यांच्या प्रवासाला सुखरूप सोडण्यासाठी या समुद्रकिनाऱ्यावर दोन स्वयंसेवी संस्था, “सह्याद्री निसर्ग मित्र” आणि “कासव मित्र मंडळ”, गेल्या १० ते १२ वर्षापासून अथकपणे कोणत्याही स्वार्थाशिवाय आणि मोबदल्याशिवाय यशस्वीरीत्या त्यांचे काम करत आहेत.
The village is quiet, but during the three months from February to April, a large number of tourists visit the village, due to the “Sea Turtle Festival”.
Today, there are only six to seven species of sea turtles left in the world, and they too are on the verge of extinction. A very rare species of turtle named “Olive Ridley” come here for breeding. During the months of November and December, countless females lay their eggs in a sand nest on the beach and return to their habitations, never to return.
After two to three months, the chicks slowly emerge from the nest and begin the journey of their lives. In the case of these turtles, it is said that when one of the 1000 chicks hatches, only one of the lucky turtles survives. For this reason, the breeding, rearing and protection of these turtles are of great importance. The middle period of this process is very delicate and important because the female of the tortoise never lives with her eggs, so those eggs and alternatively the turtles are targeted by many animals, birds, snakes and sometimes even humans, sometimes due to natural disasters.
For the last 10 to 12 years, two NGOs, “Sahyadri Nisarg Mitra” and “Kasav Mitra Mandal”, have been working tirelessly to protect the eggs of these turtles, take care of them and release them safely after hatching. Are doing.
कासवांच्या माद्या अंडी देऊन निघून जातात त्यानंतर या संस्थांचे स्वयंसेवक अख्खा समुद्रकिनारा पालथा घालून सर्व अंडी शोधून किनाऱ्यावरच एका सुरक्षित जागी नैसर्गिकरित्या विकसित करतात. एका घरट्यात साधारणपणे ७५ ते १२५ अंडी सहज असतात, अशी १५ ते २० घरटी जतन केली जातात. ही सर्व घरटी बांबूच्या टोपल्याखाली झाकली जातात आणि स्वयंसेवक नियमितपणे या घरट्यावर लक्ष्य ठेवून असतात.
अंड्यांचा विकासकाळ जवळ येतो तेव्हा रोज हे स्वयंसेवक दिवसातून २ वेळा, सकाळी आणि संध्याकाळी घरट्यांची तपासणी करतात आणि जर पिल्ले जमिनीवर आली असतील तर अलगदपणे ती पिल्ले समुद्रात सोडली जातात. या उपक्रमासाठी झटणाऱ्या “सह्याद्री निसर्ग मित्र” आणि “कासव मित्र मंडळ” या दोन संस्थांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
हे सर्व याचि देही याचि डोळा पाहणे म्हणजे एक अवर्णनीय सोहळा असतो. तुमच्या माझ्या सारख्यांना हा सोहळा पाहता यावा म्हणून या संस्था आणि त्यांचे स्वयंसेवक दर दिवशी इथे हजर राहून मार्गदर्शन करतात.
After the turtles lay their eggs and leave, the volunteers of these organizations lay all the beaches on the beach, find all the eggs and develop them naturally in a safe place on the shore. About 75 to 125 eggs are easily laid in one nest, 15 to 20 nests are saved. All of these nests are covered under bamboo baskets, and volunteers regularly monitor the nests.
As the egg-laying season approaches, these volunteers inspect the nest twice a day, in the morning and in the evening, and if the chicks are on the ground, they are released into the sea. There is little to commend “Sahyadri Nisarg Mitra” and “Kasav Mitra Mandal” for their efforts in this endeavour.
Seeing all this with his own eyes is an indescribable ceremony. These organizations and their volunteers are here every day to guide people like you and me to watch this ceremony.
सोमवार ते शुक्रवार तशी गर्दी कमीच असते पण शनिवारी आणि रविवारी येथे सहज शे-दिडशे पर्यटकांचा वावर असतो. हल्ली विदेशी पर्यटकांचा सहभाग देखील लक्षणीय दिसून येतो. अशावेळी एरवी एकटाच असणारा वेळासचा विलोभनीय समुद्रकिनारा सकाळी ६:३० वाजल्यापासूनच उत्साही पर्यटकांच्या उपस्थितीत कात टाकून टवटवीत झालेला असतो.
सूर्यदेवाने नुकताच आळस झटकून इमानेइतबारे त्याच्या दिनचर्येला सुरुवात केलेली असते. अनेकविध पक्षी आपआपल्या घरट्यातून त्यांच्या दाण्या-पाण्यासाठी चहूबाजूला विहार करत असतात. समुद्राच्या धीरगंभीर आवाजाने संपूर्ण वातावरण भारावून गेलेले असते. या पार्श्वभूमीवर सर्व जण वाट पाहत असतात ते स्वयंसेवक येण्याची आणि कासवांच्या पिल्लांचे लोभसवाणे रूप डोळ्यात साठवण्याची. ठरलेल्या वेळेवर स्वयंसेवक न चुकता येतात, सर्वाना या कासवाबद्दल माहिती देतात, ते चालवत असलेल्या उपक्रमाचे महत्त्व समजावून सांगतात.
आणि मग ज्या क्षणाची सगळे जण वाट पाहत असतात तो क्षण जवळ येतो….
From Monday to Friday the crowd is less but on Saturdays and Sundays, there are easily hundreds of tourists. Nowadays, the participation of foreign tourists is also significant. In such a time, the enchanting beach of Velas, which is the only one in Ervi, has been flourishing since 6:30 am in the presence of enthusiastic tourists.
The Sun God would have just shaken off his laziness and started his routine about faith. Many birds are roaming around in their nests for their seeds and water. The gentle sound of the sea overwhelms the whole atmosphere. Against this backdrop, everyone is waiting for the volunteers to arrive and to catch a glimpse of the baby turtles. Volunteers don’t miss out on time, they tell everyone about the turtle, they explain the importance of the initiative they are running.
And then the moment everyone is waiting for comes closer ….
मग एखादा स्वयंसेवक एक एक करून टोपली उघडून पाहतो, एव्हाना सगळ्यांचेच प्राण त्यांच्या डोळ्यांत आलेले असतात. सगळ्यांचे हात नकळत जोडले जातात, प्रार्थना म्हटल्या जातात, एक एक टोपली उचलली जाते आणि…. आणि एकच गलका होतो, सगळेजण एकमेकांचे असे अभिनंदन करतात जणू काही त्यांच्याच घरात एखादा नवा पाहुणा आलेला असतो.
उत्कंठतेने आणि उत्साहाने भारलेले वातावरण आता अधिकच आनंदमयी होऊन गेलेले असते. लहान मुले टाळ्या वाजवून त्यांच्या छोट्या दोस्तांचे स्वागत करतात, काही सूक्ष्मपणे त्यांचे निरीक्षण करतात, तर काहींना त्यांचं बारसंच करायची घाई असते. बाहेर आलेल्या पिल्लाना मग हळुवारपणे एका टोपलीत ठेवले जाते आणि त्यांना समुद्राच्या काठावर आणून सोडले जाते.
Then one of the volunteers opens the basket one by one and sees that everyone’s life is in their eyes. Everyone’s hands are unknowingly joined, prayers are said, one basket is picked up and … and one cheer happens, everyone greets each other as if a new guest has come to their house.
The atmosphere filled with excitement and excitement would have been much happier now. The little ones greet their little ones with a round of applause, some observe them closely, and some rush to their bar. The hatched puppies are then gently placed in a basket and released into the sea.
त्या ओल्याशार वाळूवर जेव्हा त्या इवल्या इवल्या कासवांचे पहिले पाउल पडते तेव्हा नकळतच आपले अंग शहारून येते. मग हळूहळू मजल दरमजल करत ते केविलवाणे जीव या अथांग सागरात स्वतःला झोकून द्यायला निघतात.
अवघ्या १०-१२ फुटांचे अंतर पण ते पार करतानासुद्धा या पिल्लांची होणारी दमछाक पाहून नकळतच एक प्रश्न मनात चमकुन जातो, “हे निरागस, निष्पाप पिल्लू या निष्ठुर जगात स्वतःला निभावून तर नेईल ना?” हा विचार करत असतानाच एक भली मोठ्ठी लाट त्यांना आपल्या उदरात सामावून नेते.
When the first footsteps of those tortoises fall on that wet sand, their limbs unknowingly come out of the city. Then, slowly, step by step, they begin to immerse themselves in this endless ocean of sorry creatures.
The distance of only 10-12 feet, but even after crossing it, seeing the exhaustion of these puppies, a question suddenly flashes in my mind, “Will this innocent, innocent puppy survive in this cruel world?” While thinking this, a big wave carries them in its belly.
दुसऱ्याच क्षणाला ते इवलंसं पिल्लू पोहायला देखील सुरुवात करतं… आणि आपण मात्र मनातल्या मनातच हसतो… कदाचित प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरं जाणं त्या पिल्लाने शर्यतीमधल्या त्याच्या पुर्वजाकडूनच शिकलं असेल, नाही का?
- अमेय धुमाळ
At the second moment, the ivory puppy also starts swimming … and we just smile in our hearts … maybe the puppy learned to face every challenge with courage from his ancestor in the race, didn’t he?
- Ameya Dhumal
Amazing Amey….awaiting many more such blogs…. all the Best Dear
Thank you so much.. please keep reading and sharing!
Lived the moment with your experience
Thank you buddy!